Thursday, September 05, 2024 10:02:04 AM

Ashadi Ekadashi Mahapuja 2024
विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सपत्नीक शासकीय महापूजा केली.

विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सपत्नीक शासकीय महापूजा केली. अभ्यंगस्नानाने महापूजेची सुरुवात झाली. मंत्रोपचाराने विठुमाउलीची शासकीय महापूजा संपन्न झाली. सर्व संकटं दूर कर, पाऊस पडू दे, चांगलं पीक येऊ दे, देशातील सर्व घटक सुखी होऊ दे; असे साकडे मुख्यमंत्र्यांनी विठुमाउलीच्या चरणी घातले.  याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, यांच्यासह अनेक मंत्री आणि खासदार उपस्थित होते.

यंदा नाशिकच्या शेतकरी कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महापूजा करण्याचा मान मिळाला. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अंबासन या गावचे रहिवासी बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या दाम्पत्याला यांना महापूजा करण्याची संधी मिळाली. अहिरे दाम्प्त्य मागील सोळा वर्षांपासून वारी करत आहे. 

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी सहकुटुंब पंढरपूर येथे पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा समारोप केला. यावेळी त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 'एक वारकरी एक झाड' ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन केले. 


सम्बन्धित सामग्री