Sunday, June 30, 2024 09:20:37 AM

Asaduddin Owaisi
'ओवैसींची खासदारकी रद्द करा'

एमआयएमचे भाग्यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात करण्यात आली.

ओवैसींची खासदारकी रद्द करा

मुंबई : एमआयएमचे (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन / एआयएमआयएम / एमआयएम) भाग्यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर काही घोषणा दिल्या. यात जय पॅलेस्टाईन अशी एक घोषणा होती. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्याही सदस्याने भारत सोडून इतर कोणत्याही देशाला समर्थन देणे अवैध आहे. भारतीय संसदेत शपथ घेतांना इतर कोणत्याही देशाशी किंवा देशांशी निष्ठा ठेवणे, हा देशद्रोह आहे, तसेच हा भारताचा अपमान आहे. याच कारणामुळे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात असदुद्दीन ओवैसी यांचा निषेध करण्यात आला. तसेच ओवैसींची खासदारकी रद्द करा अशी मागणी करणारा ठराव करण्यात आला. या ठरावाची प्रत लोकसभेच्या सभापतींना पाठवली जाणार आहे. ‘जय पॅलेस्टाईन म्हणणारे भविष्यात ‘जय हमास’ आणि त्याही पुढे जाऊन ‘जय पाकिस्तान’ म्हणू शकतात. ही शक्यता विचारात घेऊन ओवैसींवर निवडणूक लढवण्यासाठी कायमची बंदी घालावी, अशीही मागणी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात झालेल्या ठरावांचे स्वागत केले. 


सम्बन्धित सामग्री