Sunday, June 30, 2024 08:33:20 AM

Arvind Kejriwal
केजरीवालांचा मुक्काम तिहारमध्येच

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

केजरीवालांचा मुक्काम तिहारमध्येच

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. दारू घोटाळ्याशी संबंधित पैशांद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. त्यांना कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. याआधी उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाला स्थगिती दिली होती. 

कनिष्ठ न्यायालयाने ईडीच्या कागदपत्रांचा खोलात जाऊन विचार केला नाही. पीएमएलएच्या कलम ४५ च्या तरतुदी देखील न्यायालयाने विचारात घेतल्या नाही, असा ठपका ठेवत दिल्ली उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा जामिनाचा निर्णय रद्द केला.


सम्बन्धित सामग्री