Thursday, June 27, 2024 08:03:29 PM

Kejriwal
केजरीवाल यांना जामीन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मिळाला आहे.

केजरीवाल यांना जामीन

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मिळाला आहे. केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या मुचलक्यावर सोडण्यात आले आहे. न्यायालयाने ईडीला केजरीवाल यांच्या जामीन प्रकरणात बाजू मांडण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला आहे. ताज्या निर्णयानुसार केजरीवाल जामिनाबाबतची प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी दिल्लीच्या तिहार तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. पण ईडीची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय फिरवला तर केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढू शकतो. पण ईडीने विरोध केला नाही अथवा ईडीची बाजू ऐकल्यानंतरही न्यायालयाने जामिनाबाबतचा निर्णय कायम ठेवला तर केजरीवाल तुरुंगातून बाहेर येतील.

केजरीवाल यांना एप्रिल महिन्यात अटक झाली. नंतर लोकसभा निवडणुकीच्या काळात मर्यादीत काळासाठी प्रचाराकरिता जामीन मिळाला. मुदत संपताच केजरीवाल यांना २ जून रोजी पुन्हा तुरुंगात जावे लागले. यानंतर २० जून रोजी केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन देत असल्याचा निर्णय दिला. काही दिवसांपूर्वी विशेष न्यायाधीशांनी केजरीवाल यांना ३ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. हा निर्णय आल्यानंतर केजरीवाल यांच्याकडून नव्याने जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न झाले. अखेर त्यांना जामीन मिळाला आहे.


सम्बन्धित सामग्री