Sunday, June 30, 2024 09:29:44 AM

Modi Speech
'केजरीवालांनी अण्णांचा विश्वासघात केला'

अरविंद केजरीवालांनी अण्णा हजारेंचा विश्वासघात केला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

केजरीवालांनी अण्णांचा विश्वासघात केला

पतियाळा : अरविंद केजरीवालांनी अण्णा हजारेंचा विश्वासघात केला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते पतियाळा येथे लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते. अण्णा हजारे यांनी दारूबंदीसाठी मोठे आंदोलन केले. भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी अण्णांनी उपोषण केले. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या केजरीवालांचा दिल्ली दारू घोटाळ्यात अर्थात अबकारी कर घोटाळ्यात हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील पतियाळा येथे लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी केजरीवालांबाबत एक वक्तव्य केले. 


सम्बन्धित सामग्री