Saturday, September 28, 2024 01:52:01 PM

Ambedkar meet OBC hunger strikers
आंबेडकर ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीला

ओबीसी आरक्षण बचाव उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा गुरूवारी आठवा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली आहे.

आंबेडकर ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीला

जालना : ओबीसी आरक्षण बचाव उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा गुरूवारी आठवा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली आहे. वडीगोद्रीमध्ये सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी ही भेट दिली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली असल्याने डॉक्टरांनी सलाईन घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आंबेडकरांनी त्यांची भेट घेतली असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 

महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. उपोषणाच्या अनुषंगाने सरकार कुठलंही पाऊल उचलताना दिसत नाही. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ओबीसीचं आरक्षण हे ओबीसींकडेच असायला हवे. आंदोलनाकडे सरकारनं गांभीर्याने पाहावं त्याचबरोबर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी आंबेडकरांनी सरकारल केली आहे तसेच ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचा सरकारचा कट असल्याचे टीका आंबेडकरांनी केली आहे.   


सम्बन्धित सामग्री