मुंबई : संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे सेनेची युती तुटली आहे. स्वबळावर विधानसभेच्या ५० जागा लढवण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडची ही घोषणा म्हणजे ठाकरे सेनेला राजकीय धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाकरे सेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात २०२२ मध्ये युती झाली. या युतीमुळे ठाकरे सेनेकडून विधानसभेच्या निवडक जागांवर लढण्याची संधी मिळेल असा विचार संभाजी ब्रिगेड करत होती. पण ती आशा मावळू लागताच संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत युती तोडून स्वबळावर लढण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली आहे.