मुंबई : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली.त्यात आता महायुतीच्या घटक पक्षातील रिपाई आठवले गटाने अकोला पूर्व आणि बाळापूर मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपाई आठवले गटाकडून दिली आहे. त्यामुळे महायुतीतील पक्षात जागा वाटपावरून वाद होण्याची चिन्ह दिसत आहेत.