बारामती : विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज सकाळपासून सुरू आहे. नुकताच बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार विजयी झाले आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून बारामती मतदारसंघ चर्चेत आहे.
बारामतीत पवार कुटुंबात लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार विरूद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून युगेंद्र पवार अशी लढत होती. या लढतीत अजित पवार विजयी झाले आहेत. अजित पवार 40 हजारांहून अधिक मताधिक्क्यांने विजयी झाले आहेत.
बारामतीत कोण गुलाल उधळणार याची चर्चा होती. अजित पवारांच्या राष्ट्रावादीने अखेर गुलाल उचलला म्हणणं वावग ठरणार नाही. अजित पवारांचे यश महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांचे फळ आहे. अजित पवार यांना मिळालेल्या यशात सर्वात जास्त चर्चा लाडकी बहीण योजनेची आहे. लाडकी बहीण योजना आणल्यामुळे सर्व बहीणींच्या मनात महायुतीने स्थान निर्माण केले आणि यामुळे अजित पवार यशात भर पडली.