बारामती : नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार यादी जाहीर झाली. या यादीतून अजित पवार बारामतीतून लढणार असल्याचे समजते. सुरूवातीपासून अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याचे सांगत होते. परंतु आता त्यांचे नाव उमेदवारीसाठी जाहीर झाले आहे. तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीतून युगेंद्र पवार यांचे नाव उमेदवारीसाठी जाहीर झाले आहे.बारामतीत खऱ्या अर्थाने अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार असा सामना बघायला मिळणार आहे. बारामतीत एकाच घरातून लढत पाहायला मिळणार आहे.
सुरूवातीपासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत कोण जिंकेल हे महत्त्वाचे ठरणार आहे.