Thursday, September 19, 2024 12:51:03 AM

Ajit Pawar
कांदा, बासमती तांदूळ, खाद्यतेलाबाबतच्या केंद्राच्या निर्णयांचे अजित पवारांकडून स्वागत

कांदा, बासमती तांदूळ, खाद्यतेलाबाबतच्या केंद्राच्या निर्णयांचे अजित पवारांनी स्वागत केले.

कांदा बासमती तांदूळ खाद्यतेलाबाबतच्या केंद्राच्या निर्णयांचे अजित पवारांकडून स्वागत

मुंबई : देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह,  वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले आहेत.

देशांतर्गत अन्नधान्याच्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी कांदा आणि बासमती तांदळावर निर्यात मूल्य लावले होते. हे निर्यात मूल्य केंद्र सरकारने हटवले आहे. या निर्णयांचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सोयाबीनच्या किंमती वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे.


सम्बन्धित सामग्री