मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला आहे. अजित पवार म्हणाले की, सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ते पुढे म्हणाले की, असे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे आणि हे आम्ही कधीही स्वीकारणार नाही. शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका किंवा अनादर राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने शरद पवार यांना आदर देण्याचे आणि त्यांचा सन्मान कायम राखण्याचे ठरवले आहे. शरद पवार यांच्या कार्याची महत्त्वपूर्ण भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात असून, त्यांच्या सन्मानाचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले सदाभाऊ खोत ?
भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरून खोचक प्रश्न विचारत म्हटलं, “आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?” त्यांनी पवार साहेबांवर आरोप करत म्हटलं, “तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने, बँका आणि सुतगिरण्या हाणल्या, पण तुम्हाला महाराष्ट्र बदलायचा आहे.” खोत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.