Tuesday, June 25, 2024 12:08:16 PM

RTO administration woke up
कल्याणीनगर अपघातानंतर आरटीओ प्रशासनाला आली जाग

कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन मुलाने चालविलेली पोर्शे या कारची नोंदणी केलेली नव्हती. ती बंगळुरू येथील वाहन विक्रेत्यांकडून तात्पुरती नोंदणी करून आणण्यात आली होती. पण, ती रस्त्यावर आणण्यास परवानगी नव्हती

कल्याणीनगर अपघातानंतर आरटीओ प्रशासनाला आली जाग

पुणे   कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन मुलाने चालविलेली पोर्शे या कारची नोंदणी केलेली नव्हती. ती बंगळुरू येथील वाहन विक्रेत्यांकडून तात्पुरती नोंदणी करून आणण्यात आली होती. पण, ती रस्त्यावर आणण्यास परवानगी नव्हती. तरीही ती रस्त्यावर आणून तिने अपघात केला. त्यानंतर पुणे आरटीओने शहरात विना नोंदणी रस्त्यावर आलेल्या वाहनांची शोध मोहीम सुरू केली आहे. आरटीओच्या वायुवेग पथकांनी केलेल्या तपासणीमध्ये शहरात विना नोंदणी न करता रस्त्यावर आणलेली तीन वाहने आढळून आली असून, ज्या वाहन विक्रेत्यांकडून ही दुचाकी देण्यात आली त्या विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात येणार आहेत."मोहिमेत सापडलेले ड्रंक अँड ड्राइव्हचे सर्व खटले तसेच अल्पवयीन ड्रायव्हिंग प्रकरणे न्यायालयात पाठवले जाणार आहेत. तर नोंदणी नसलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित विक्रेत्याचे (डीलर) ट्रेड सर्टिफिकेट निलंबित करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार आहे.


सम्बन्धित सामग्री