मुंबई: विधानसभा संपली आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे हे नगरसेवकांना मार्गदर्शन करणार असून नगरसेवकांकडून वॉर्डनिहाय माहिती घेणार असल्याचं समोर आलं आहे. महानगर पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष सरसावले आहे. याच पार्शवभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पालिकेची तयारी करतांना दिसून येत आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली असून उद्धव ठाकरे नगरसेवकांची बैठक घेणार असून नगरसेवकांना बैठकीतून मार्गदर्शन करणार करणार आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु केली असल्याची माहिती समोर आली असून महानगर पालिकेवर कोणाची सत्ता येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.