Sunday, December 15, 2024 01:16:40 AM

Adjournment of demolition notice of Hanuman temple
दादरमधील हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती

दादर येथील हनुमान मंदिराचा विषय चांगलाच तापला होता. त्यातच आता हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.

 दादरमधील हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती

मुंबई : दादर येथील हनुमान मंदिराचा विषय चांगलाच तापला होता. त्यातच आता हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. रेल्वेतील हमालांनी बांधलेले हे हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस पाठवली होती. या नोटीसीनंतर सर्वत्र वातावरण तापलं होत . सात दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्थांनी स्वत: मंदिर पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल या आशयाची नोटीस रेल्वे कडून देण्यात आली होती. यानंतर आता आरतीआधी नोटीसला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आमदार मंगाल प्रभात लोढा यांनी दिली आहे. 

काय आहे मंदिराचे वैशिष्टय? 

“दादरमधील हे हनुमानाचे मंदिर गेल्या ८० वर्षांपासून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सेवा केली जाते. हे मंदिर दादर रेल्वे स्थानक होण्याच्या आधीपासून या परिसरात आहे. हे हनुमानाचे मंदिर या ठिकाणी असलेल्या हमालांचे आहे. एका झाडाखाली ही मूर्ती मिळाली होती. त्यानंतर त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. 

काय होती नोटीस? 

दादर पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 12च्या बाहेर अनधिकृत मंदिर आहे. 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्थांनी स्वत: पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल, असे या नोटीसमध्ये म्हणण्यात आले होते.  

दरम्यान आता हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली असल्याचं आमदार मंगाल प्रभात लोढा यांनी सांगितलं आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo