Tuesday, April 08, 2025 01:20:52 PM

अभिनेत्री उर्मिलाने केला घटस्फोटासाठी अर्ज

उर्मिला मातोंडकर पती  मोहसिन अख्तर यांच्याशी घटस्फोट घेणार आहे.

अभिनेत्री उर्मिलाने केला घटस्फोटासाठी अर्ज 

मुंबई : ९० च्या दशकातील एव्हरग्रीन अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही सध्या चर्चेत आहे. उर्मिला पती  मोहसिन अख्तर यांच्याशी घटस्फोट घेणार आहेत. उर्मिला ८ वर्षानंतर घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. ३ मार्च २०१६ रोजी उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर या दोघांचा विवाह झाला आणि आता त्यांचा घटस्फोट घेणार असल्याची माहिती तिची चाहत्यांसाठी धक्कादायक बाब आहे. 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हीने फक्त अभिनयच नाही तर राजकीय क्षेत्रातही काम केले आहे. २०१९ मध्ये तिने काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणूकीत तिचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी शिफारस करण्यात आली. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून (शिउबाठा) त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्यामुळे उर्मिला मातोंडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.  


सम्बन्धित सामग्री