Friday, September 13, 2024 01:56:25 PM

Kolhapur
लाडकी बहीण योजनेचे पैसे कापून घेणाऱ्यांवर कारवाई होणार

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे पैसे खात्यात जमा होताच बँकांकडून वेगवेगळ्या नियमांचा आधार घेत खातेदारांचे पैसे कापून घेण्यात आल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली

लाडकी बहीण योजनेचे पैसे कापून घेणाऱ्यांवर कारवाई होणार

कोल्हापूर : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे पैसे खात्यात जमा होताच बँकांकडून वेगवेगळ्या नियमांचा आधार घेत खातेदारांचे पैसे कापून घेण्यात आल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे कापून घेणाऱ्या बँकांवर कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

राज्य शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही कल्याणकारी योजना सुरू केली आहे. या योजनेत लाभार्थींना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. राज्य शासनाने यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत. हे पैसे एकदम देत योजना सुरू करण्यात आली आहे. योजना सुरू झाली... पैसे खात्यांमध्ये जमा झाले आणि बँकांकडून वेगवेगळ्या नियमांचा आधार घेत खातेदारांचे पैसे कापून घेण्यात आल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. यानंतर मुख्यमंत्र्यांनी बँकांना कडक शब्दात ताकीद दिली. कल्याणकारी योजनेचे पैसे कापून घेऊ नका. या पद्धतीने वागणार असाल तर बँकांवर कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

याआधी कोल्हापूरच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना सुरू राहणार आहे. योजना बंद करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगितले. 


सम्बन्धित सामग्री