Thursday, April 10, 2025 06:38:44 PM

'अब्दुल सत्तारांचा प्रचार करणार नाही'

सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर मित्रपक्ष भाजपाने बहिष्कार टाकला आहे.

अब्दुल सत्तारांचा प्रचार करणार नाही

मुंबई : महायुतीमध्ये मित्रपक्षांचे एकमेकांमध्ये पटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर मित्रपक्ष भाजपाने बहिष्कार टाकला आहे.  सिल्लोड मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आहे. परंतु अब्दुल सत्तारांचा प्रचार करणार नाही असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना पत्र लिहले आहे.  


 
अब्दुल सत्तार भाजपा संपविण्याची भाषा करत आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत.  असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केला आहे.  याबाबतची माहिती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री