Sunday, September 29, 2024 12:30:37 AM

Aaditya Thackeray
सीईटीवरून पेटले राजकारण

सीईटीच्या मुद्यावरून राजकारण सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सीईटीवरून पेटले राजकारण

मुंबई : सीईटी परीक्षेत चुका झाल्या. एकूण २४ पेपरमध्ये ५४ चुका झाल्या, असे आमदार आदित्य म्हणाले. सीईटीच्या मुद्यावर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन परीक्षा घेणाऱ्यांवर टीका केली. यामुळे सीईटीच्या मुद्यावरून राजकारण सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सीईटीमध्ये पारदर्शकता का नाही, असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला. परीक्षेतला हा घोटाळा पैशांसाठी असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला. सीईटीच्या पर्सेंटाईलमध्ये काही ठिकाणी गोंधळ झाला, असाही आरोप आमदार आदित्य यांनी केला. 

आमदार आदित्य यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

'एकूण २४ पेपरमध्ये ५४ चुका'
'सीईटीच्या पेपरमध्ये ५४ चुका'
पारदर्शकता का नाही ? आदित्य यांचा सवाल

'परीक्षेतला हा घोटाळा पैशांसाठी असू शकतो'
विद्यार्थ्यांचे पैसे परत करा, आदित्य यांची मागणी

'सीईटीच्या पर्सेंटाईलमध्ये काही ठिकाणी गोंधळ'
'सीईटीमध्ये कुणालाच फेरपरीक्षा नकोय'

'चुका पाहून पेपर निवडणूक आयोगानं घेतलाय असं वाटलं'


सम्बन्धित सामग्री