Thursday, March 06, 2025 11:17:45 PM

Flying Car Video: OMG!! हवेत उडणारी कार आली! रस्त्यावर धावणार आणि आकाशातही उडणार; काय आहे किंमत? जाणून घ्या

वाहतूक कोंडी ही जागतिक पातळीवर प्रत्येक देशातील एक प्रमुख समस्या आहे. परंतु, आता रस्त्यावर धावणाऱ्या कार आकाशातही उडू शकतात. होय. हे स्पप्न नव्हे तर सत्य आहे.

flying car video omg हवेत उडणारी कार आली रस्त्यावर धावणार आणि आकाशातही उडणार काय आहे किंमत जाणून घ्या
Flying Car
Edited Image, Twitter

Flying Car: तुम्ही साय-फाय चित्रपटांमध्ये उडत्या गाड्या पाहिल्या असतील. आता हे सर्व प्रत्यक्षातही घडताना दिसणार आहे. हो, जगातील पहिल्या उडत्या कारचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. वाहतूक कोंडी ही जागतिक पातळीवर प्रत्येक देशातील एक प्रमुख समस्या आहे. परंतु, आता रस्त्यावर धावणाऱ्या कार आकाशातही उडू शकतात. होय. हे स्पप्न नव्हे तर सत्य आहे. कारण, आता उडणाऱ्या कारवर संशोधन करण्यात आलं असून या कारचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उडणाऱ्या कारची किंमत किती आहे?  

आता लवकरचं उडत्या गाड्यांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरताना दिसेल. अलेफ एरोनॉटिक्सने अशी कार बनवली आहे, जी केवळ रस्त्यावर धावणार नाही तर गरज पडल्यास हवेतही उडू शकेल. या कारची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही कार सामान्य कारप्रमाणे चालवता येते. पण त्याच्या बोनेटमध्ये प्रोपेलर बसवलेले आहेत, जेणेकरून ती कधीही विमानासारखे उड्डाण करू शकेल. 

हेही वाचा - मोबाईल फोनच्या Radiation मुळे मृत्यू होऊ शकतो का? WHO ने केला खुलासा

अलेफ एरोनॉटिक्सने जारी केला उडणाऱ्या कारचा व्हिडिओ -  

अमेरिकेतील ऑटोमेकर अलेफ एरोनॉटिक्सने या कारचा पहिला व्हिडिओ रिलीज केला आहे. यात कार जमिनीवरून हवेत उडताना दिसत आहे. हे दृष्य एखाद्या चित्रपटातील असल्यासारखे जाणवते. ही कार वितरित इलेक्ट्रिक प्रोपल्शन वापरते, ज्यामध्ये प्रोपेलर ब्लेडवर जाळीचा थर असतो, ज्यामुळे कार उडू शकते. 

हेही वाचा - Zuchongzhi 3.0: चीनचा नवीन Supercomputer गुगलच्या Sycamore पेक्षा 10 लाख पट वेगवान; काय आहे खास? वाचा

उडणाऱ्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - 

न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, कंपनीने चाचणीसाठी एक प्रोटोटाइप वापरला. अलेफच्या सीईओने या कामगिरीची तुलना 1903 च्या राईट ब्रदर्सच्या किट्टी हॉक व्हिडिओशी केली आणि सांगितले की, ड्राइव्ह आणि फ्लाइट चाचणी वास्तविक जगातील शहरी वातावरणात तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा पुरावा देते. सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या उडणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये गाडी रस्त्यावरून हवेत कशी उड्डाण करते ते स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर नेटीझन्स या कारबद्दल खूपचं उत्साही दिसून येत आहे. काही वापरकर्ते असेही विचारत आहेत की, ही कार व्यावसायिकरित्या उपलब्ध होईल का? 

हवेत उडणाऱ्या कारची वैशिष्ट्ये - 

प्राप्त माहितीनुसार, कंपनी दोन आसनी अलेफ मॉडेल ए लाँच करू शकते. त्याची उड्डाण श्रेणी 110 मैल असेल आणि ड्रायव्हिंग श्रेणी 200 मैल असेल. कंपनीने सांगितले की त्यांना आतापर्यंत 3300 प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. 2035 पर्यंत, कंपनी अलेफ मॉडेल झेड लाँच करू शकते जी 4-सीटर कार असेल. त्याची उड्डाण श्रेणी 200 मैल असेल आणि ड्रायव्हिंग श्रेणी 400 मैल असेल.
 


सम्बन्धित सामग्री