अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या धोरणात्मक बदलांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे उथापालथ सुरु आहे. त्यांनी विविध देशांवर टॅरीफ लादण्याच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम शेअर बाजारासह मौल्यवान धातूंवरही झाला असून, सोन्याच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ- उतार पाहायला मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याने उच्चांकी दर गाठल्यानंतर शुक्रवारी मोठी घसरण झाली. अमेरिकन डॉलरच्या दरात वाढ झाल्याने MCX वायदे बाजारात सोन्याचा दर दबावात आला. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर ₹85,715 पर्यंत खाली आला, तर काही वेळातच हा ₹85,690 पर्यंत घसरला. मात्र, काही वेळानंतर पुन्हा सुधारणा होऊन ₹85,690 चा इंट्राडे उच्चांक गाठला.
हेही वाचा : वंदे भारतच्या तुलनेत अमृत भारत एक्सप्रेसचा कराल स्वस्त प्रवास लवकरचं
जागतिक बाजारात गेल्या सात आठवड्यांपासून सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. कोविड-१९ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली असून, $2,622 प्रति औंस वरून $2,934 पर्यंत मजल मारली आहे. मागील व्यापार सत्रातही सोन्याने $2,954 चा विक्रमी उच्चांक गाठला होता.
आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम):
22 कॅरेट सोन्याचे दर:
• मुंबई – ₹80,710
• पुणे – ₹80,710
• नागपूर – ₹80,710
• कोल्हापूर – ₹80,710
• जळगाव – ₹80,710
• ठाणे – ₹80,710
24 कॅरेट सोन्याचे दर:
• मुंबई – ₹88,050
• पुणे – ₹88,050
• नागपूर – ₹88,050
• कोल्हापूर – ₹88,050
• जळगाव – ₹88,050
• ठाणे – ₹88,050
सोन्याच्या किंमती वाढत-घसरत असल्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता कायम राहिल्यास सोने पुढील काही दिवसांत पुन्हा वधारू शकते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी योग्य संधी शोधून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
(सूचना: हे दर वेळेनुसार बदलू शकतात. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)