Saturday, September 28, 2024 10:35:28 PM

GST
जीएसटी समितीच्या बैठकीत झाले 'हे' निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी समितीच्या बैठकीत अनेक निर्णय झाले.

जीएसटी समितीच्या बैठकीत झाले हे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी समितीच्या बैठकीत अनेक निर्णय झाले. प्लॅटफॉर्म तिकीट, बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवा इत्यादींना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. बनावट बिलांना रोखण्यासाठी संपूर्ण भारतात बायोमॅट्रिक प्रमाणीकरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावित सुधारणांचा उद्देश जीएसटी प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ बनवणे आहे.

जीएसटी समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या शिफारशी

  1. दुधाच्या सर्व प्रकारच्या कॅनवर (लोखंडी, अॅल्युमिनियम, स्टीलचे) १२ टक्के जीएसटी
  2. रेल्वेचे फलाट तिकीट, बॅटरी कार, प्रतीक्षा कक्ष यांच्या तिकिटावरील जीएसटी रद्द
  3. जीएसटी नोंदणीसाठी आधार बायोमेट्रिक नोंदणी बंधनकारक
  4. थकीत जीएसटीवरील व्याज आणि दंड माफ
  5. शैक्षणिक संकुलांबाहेरील वसतिगृहांमध्ये दरमहा प्रतिव्यक्ती २० हजार रुपयांपर्यंत करसवलत
  6. कार्टन बॉक्स आणि स्प्रिंकलर यावर १२ टक्के कर
  7. खते जीएसटीमुक्त करण्याची शिफारस
  

सम्बन्धित सामग्री