Saturday, November 02, 2024 11:04:42 PM

Maharashtra Vidhan Sabha Election
वेगवेगळ्या कारवायांमधून राज्यात २३४ कोटी ४९ लाख रुपये जप्त

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत वेगवेगळ्या कारवायांमधून २३४ कोटी ४९ लाख रुपये जप्त करण्यात आले

वेगवेगळ्या कारवायांमधून राज्यात २३४ कोटी ४९ लाख रुपये जप्त

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत वेगवेगळ्या कारवायांमधून २३४ कोटी ४९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सी-व्हिजिल अॅपवर आचारसंहिता भंग झाल्याच्या २०६२ तक्रारी आल्या. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या या तक्रारींपैकी २०५९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. ही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

सजग नागरिकांना  आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल ॲप हे कोणत्याही ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo