वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प २६७ तर कमला हॅरिस २२४ जागांवर आघाडीवर आहेत. आतापर्यंत हाती आलेले कल बघता निवडणुकीत ट्रम्प यांची बाजू वरचढ दिसत आहे. संपूर्ण निकाल पुढील काही तासांत अपेक्षित आहे. ज्या उमेवाराला २७० किंवा त्यापेक्षा जास्त इलोक्टोरल व्होट्स जिंकता किंवा मिळवता येतात तो अमेरिकेचा अध्यक्ष होतो.
अमेरिकेच्या व्यवस्थेनुसार एखाद्या राज्यात ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्याच्या खात्यामध्ये त्या राज्यासाठीची सगळी इलेक्टोरल व्होट्स जमा होतात. अमेरिकेतली दोन राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हा नियम आहे. यामुळे ट्रम्प आणि हॅरिस यांच्यातील कोण जास्त इलोक्टोरल व्होट्स मिळवण्यात यशस्वी होतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. तर कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आहेत आणि सध्या बायडेन प्रशासनात उपाराष्ट्राध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन वय आणि तब्येतीच्या कारणामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांना २७७ इलेक्टोरल मतं
ट्रम्प होणार अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष
मोदींनी केले ट्रम्प यांचे अभिनंदन
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाकडून जगातील सर्वात श्रीमंत लोकशाहीचे अभिनंदन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांची सरशी होताच मोदींनी त्यांचे ट्वीट करुन अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प हे मैत्री आहे. ट्रम्प यांच्या काळात भारत आणि अमेरिका यांची मैत्री वृद्धिंगत होत होती. यामुळे पुन्हा ट्रम्प पर्व सुरू झाल्यावर भारत आणि अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध आणखी सुधारण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील व्यवस्थेनुसार निवडणुकीत सरशी झाली तरी ट्रम्प अध्यक्ष म्हणून शपध घेऊन जानेवारी २०२५ मध्ये पदभार स्वीकारतील.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही ट्वीट करुन रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांची सरशी होताच मोदींनी त्यांचे ट्वीट करुन अभिनंदन केले.
ट्रम्प यांची कारकिर्द
डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून १९६८ मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली
ट्रम्प यांनी २०१७ ते २०२१ पर्यंत अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून काम केले
ट्रम्प यांनी २०१६ च्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता
ट्रम्प यांनी २०२० च्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याकडून ७ दशलक्ष मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला
ट्रम्प यांनी अधिकृतपणे चार वेळा अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली