Monday, September 16, 2024 01:53:04 PM

Railway
पश्चिम रेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक

ऐन गणेशोत्सवात पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकची सुरुवात शनिवारी रात्री बारा वाजता होईल.

पश्चिम रेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : ऐन गणेशोत्सवात पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकची सुरुवात शनिवारी रात्री बारा वाजता होईल. मेगाब्लॉक रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत असेल. गोरेगाव - कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मेगाब्लॉक काळात गोरेगाव - कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी आवश्यक असलेली विविध तांत्रिक कामं केली जातील. ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांची पंचाईत होणार आहे. 

बोरिवली - विरार रेल्वे विस्ताराचा मार्ग मोकळा

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली-विरार स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या आड येणारी २,६१२ खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सार्वजनिकदृष्ट्या हिताचा आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय फायदे आहेत, असे सांगत उच्च न्यायालयाने मार्गिकेच्या आड येणारी २,६१२ खारफुटी तोडण्यास परवानगी दिली. या निर्णयामुळे या मार्गिका विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान भरून काढण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाला ७,८२३ खारफुटीचे पुनर्रोपण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री