Sunday, September 08, 2024 10:26:51 AM

Thane Crime News
सनमला न्यायालयीन कोठडी

ठाण्यात राहणाऱ्या सनमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली आहे.

सनमला न्यायालयीन कोठडी

ठाणे : ठाण्यात राहणाऱ्या सनमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली आहे. ठाण्यातून पाकिस्तानमध्ये जाऊन सनमने निकाह केला. काही काळानंतर ती पुन्हा भारतात आली. सनमच्या या वर्तनाची ठाणे पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत समाधानक उत्तरे मिळाली नाही. अखेर पोलिसांनी सनमला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सनमला न्यायालयीन कोठडी दिली. 

नेमकं काय घडलं ?

ठाण्याच्या वर्तकनगरमधील नगमा नूर मकसूद अली हिची समाज माध्यमाद्वारे पाकिस्तानमधील तरुणाशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मग या दोघांनी भेटायचं ठरवलं. पण हे दोघेही वेगवेगळ्या देशात होते. नगमा नूर मकसूद अली ही ठाण्यात होती तर तिचा प्रियकर पाकिस्तानात होता. मग नगमाने बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. नगमाने तिचं नाव बदलत सनम खान केलं. आता सनम खान या नावाने तिने बनावट कागदपत्र तयार केले. पासपोर्ट आणि व्हिसा पण तिने तयार केला. याच कागदपत्रांच्या आधारे ती तिच्या मुलीला घेऊन पाकिस्तानमध्ये गेली.

नगमा कशी पोहोचली पाकिस्तानात ?

ठाण्यातील नगमा नूर मकसूद या तरुणीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील अॅबोटाबाद गाठले. तिथं नगमाने तिच्या प्रियकराशी निकाह केला. पाकिस्तानमधील रावळपिंडी या भागात दीड महिने नगमा राहिली. नंतर १७ जुलैला ती पुन्हा भारतात आली. भारतात परत आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. ही तरुणी आली हे ठाणे पोलिसांना हे कळताच त्यांनी या तरुणीला बोलावून चौकशी सुरु केली.

कोण आहे नगमा ?

नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान असं या तरुणीचे नाव आहे. हे सगळं मे २०२३ ते २०२४ या काळात घडलं आहे. पोलिसांनी आता ठाण्यातील नगमा नूर मकसूद उर्फ सनम खान हिला ताब्यात घेतलं आहे. तिची कसून चौकशी सुरु आहे. ठाणे पोलीस सध्या नगमा नूर मकसूदच्या नातेवाईकांचाही तपास करत आहेत.

'सगळी कागदपत्रे खरी आहेत'

दरम्यान, या मुलीच्या आईने पोलीस विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. 'माझ्या मुलीने कोणतीही चूक केली नाही, सर्व कागदपत्रे खरी आहेत', असा दावा नगमाच्या आईने केला आहे.


सम्बन्धित सामग्री