Zomato Name Change: अन्न आणि किराणा मालाची डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. संचालक मंडळाने कंपनीचे नाव बदलून इटरनल लिमिटेड करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कंपनीच्या बोर्डाने नाव बदलण्यास मान्यता दिल्याने झोमॅटो लवकरच इटरनल लिमिटेड म्हणून ओळखले जाईल, असे सीईओ दीपिंदर गोयल यांनी शेअरहोल्डर्सना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. असं असलं तरी फूड डिलिव्हरी ब्रँडचे नाव झोमॅटोच राहील. हा निर्णय कंपनीसाठी एक नवीन अध्याय आहे, कारण कंपनी आता फूड डिलिव्हरीपलीकडे देखील विस्तार करणार असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे.
दीपिंदर गोयल यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'जेव्हा आम्ही ब्लिंकिट विकत घेतले, तेव्हा आम्ही कंपनी आणि ब्रँड/अॅपमधील फरक ओळखण्यासाठी अंतर्गतरित्या 'इटरनल' वापरण्यास सुरुवात केली. आम्ही असेही विचार केला होता की आम्ही कंपनीचे सार्वजनिकरित्या नाव बदलून इटरनल करू. आज, आम्ही झोमॅटो व्यक्तिरिक्त इतर सेवा देण्यास सक्षम आहोत. आम्ही आमचे स्टॉक टिकर झोमॅटो वरून 'इटरनल'मध्ये बदलणार आहोत. इटरनलमध्ये झोमॅटो, ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअर असे चार प्रमुख व्यवसाय असतील,' असेही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
हेही वाचा - 'या' दिवशी लोकांना UPI द्वारे व्यवहार करता येणार नाहीत; देशातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांना दिली माहिती
झोमॅटो अॅपचे नाव बदलणार नाही -
या बदलामुळे झोमॅटो वापरकर्त्यांना प्रश्न पडला असेल की, आता झोमॅटो अॅपचे नावही बदणार का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. कारण, कंपनी झोमॅटो अॅपचे नाव बदलणार नाही. परंतु स्टॉक टिकर झोमॅटो वरून इटरनल असे बदलले जाईल. एटरनलमध्ये चार प्रमुख व्यवसाय झोमॅटो, ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअरचा समावेश असेल.
हेही वाचा - स्मार्टफोन वापणाऱ्या लाखो यूजर्संना धोका! 28 अॅप्समध्ये आढळला SparkCat नावाचा धोकादायक व्हायरस
झोमॅटो शेअर -
गुरुवारी कंपनीचे शेअर्स 0.53 टक्क्यांनी घसरून 229.90 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 64.27 टक्क्यांची वाढ झाली आहे.