Thursday, March 13, 2025 05:46:45 AM

Reliance Share: चंदीगडच्या तरुणाचे नशीब उजळले! 30 वर्षांपूर्वी 300 रुपयांना खरेदी केलेल्या RIL शेअर्सची किंमत ऐकून लावाल डोक्याला हात

रतन ढिल्लन यांच्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. त्यांना त्यांच्या घरात जुने कागदपत्रे सापडली.

reliance share चंदीगडच्या तरुणाचे नशीब उजळले 30 वर्षांपूर्वी 300 रुपयांना खरेदी केलेल्या ril शेअर्सची किंमत ऐकून लावाल डोक्याला हात
Reliance Share
Edited Image, Twitter

Reliance Share: कधी कोणाचे नशीब कधी उजळेल सांगता येत नाही. आपण आतापर्यंत अशा अनेक घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील ज्यांचे नशीब एका क्षणात बदललं. एखाद्या व्यक्तीला अचानक अशा संधी मिळतात की, त्याचे संपूर्ण जीवन त्या एका गोष्टीमुळे बदलून जाते. रतन ढिल्लन यांच्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. त्यांना त्यांच्या घरात जुने कागदपत्रे सापडली. जेव्हा त्यांनी ही कागदपत्रे काळजीपूर्वक पाहिली तेव्हा त्यांना आढळले की हे रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे 30 वर्षे जुने शेअर्स आहेत.

10 रुपयांना खरेदी केले होते रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स - 

ऑनलाइन शेअर केलेल्या छायाचित्रांनुसार, रिलायन्सचे हे शेअर्स 1988 मध्ये फक्त 10 रुपये प्रति शेअर दराने खरेदी करण्यात आले होते. रतन ढिल्लन यांची ही पोस्ट व्हायरल होताच, अनेक वापरकर्त्यांनी हे शेअर्स त्याच्या मालकीचे आहेत की नाही आणि त्यांची सध्याची किंमत काय असू शकते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - मुंबईतील धारावीनंतर अदानी समूहाने 'या' प्रकल्पासाठी लावली 36,000 कोटींची बोली

आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या स्टॉकची किंमत काय आहे? 

शेअर बाजारातील तज्ञांनी केलेल्या गणनेनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे शेअर्स तीनदा विभाजित झाले आणि दोनदा बोनस जारी करण्यात आले. या प्रक्रियेमुळे, रतन ढिल्लन यांच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या 30 वरून आता अंदाजे 960 झाली आहे. जर आपण आजच्या शेअरच्या किमतीनुसार त्याची गणना केली तर त्याची एकूण किंमत 11.88 लाख रुपये होते. म्हणजेच, 30 वर्षांपूर्वी 300 ला खरेदी केलेल्या या शेअर्सची किंमत आज 11.88 लाख रुपये झाली आहे. 

Disclaimer:  शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!


सम्बन्धित सामग्री