नवी दिल्ली: नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अनेकांना धक्का बसला. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे अरविंद केजरवील आणि भाजपचे प्रवेश वर्मा यांच्यात लढत झाल्याचं पाहायला मिळालं. नवी दिल्ली मतदारसंघामधून दोघेही रिंगणात होते. यात वर्मा यांनी बाजी मारली तर अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. केजरीवाल यांचा पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.दरम्यान कोण आहे अरविंद केजरीवालांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा पाहुयात:
हेही वाचा: Delhi Election Results 2025: दिल्लीत भाजपाची मुसंडी
कोण आहेत परवेश वर्मा?
1. दिल्ली विधानसभा निवडणुकीत परवेश वर्मा यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली
2.प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा निवडूक लढवून बाजी मारली
3. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत
4. 48 वर्षीय परवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीचे माजी खासदार आहेत
5. प्रवेश वर्मा 2014 आणि 2019 असे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
6. 2019 मध्ये दिल्लीच्या इतिहासत सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे खासदार म्हणून प्रवेश यांनी विजय मिळवला होता. त्यांना 5 लाख 78 हजार 486 इतकं मोठं मताधिक्य मिळालं होतं.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांचा भाजपचे प्रवेश वर्मा यांनी मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर या विजयाच्या आनंदात लगेच प्रवेश वर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. शाह यांनी त्यांना त्वरित भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे परवेश वर्मा यांना नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.