Tuesday, April 08, 2025 01:20:51 PM

दिल्लीत भाजपाचे कमळ फुलणार? ; आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन

दिल्ली विधानसभा निवडणूक नेहमीच संपूर्ण देशात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेली असते. 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमतासह दिल्लीचे तख्त राखले होते.

दिल्लीत भाजपाचे कमळ फुलणार  आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक नेहमीच संपूर्ण देशात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेली असते. 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमतासह दिल्लीचे तख्त राखले होते. मात्र, आज पार पडलेल्या मतदानानंतर भाजपाला आता दिल्ली दूर नाही असे चित्र स्पष्ट झाले आहे. दिल्लीच्या सत्तेपासून अनेक वर्षे दूर असलेली भाजप या निवडणुकीत विजय मिळवून आपला 27 वर्षांचा वनवास संपवणार असल्याची भविष्यवाणी राजकीय विश्लेषकांनी केली आहे.

हेही वाचा : सुरेश धसांच्या आष्टीत पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी

दिल्लीतील मतदानानंतरची स्थिती

सलग दोनवेळी आपच्या केजरीवाल यांनी सत्ता राखली असली तरी त्याचे मताधिक्य 2015 च्य़ा तुलनेत 2020 मध्ये घसरले होते. यावेळी आपला आणखीन टक्का बसणार असे निवडणूक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

 

हेही वाचा : खासदार उदयनराजे राहुल सोलापूरकरावर संतापले; काय म्हणाले?

 

भाजपाचा टक्का कुठे वाढलाय?

पटपडगंज विधानसभा मतदारसंघ (13.95 टक्के)

किरारी मतदारसंघ (13.35 टक्के)

विकासपुरी (12.52 टक्के)

तुघलकाबाद (12.07 टक्के)

आदर्श नगर मतदारसंघात (12.02 टक्के) मतांची वाढ झालीय

भाजपाचे मताधिक्य 2020 ते 2024 दरम्यान 10 टक्क्यांहून जास्त वाढले आहे

भाजपाने दिल्लीतील 62 जागांवरील पक्षाच्या मताधिक्यात वाढ केलीय

याचा फायदा भाजपाला या विधानसभा निवडणुकीत झाल्याचा भाजपाचा दावा

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहिर झालेल्या अंदाजानुसार आपचे मताधिक्य अनेक ठिकाणी घटले असून त्याचा फायदा भाजपला होणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब होती. आता काँग्रेसने काही मते घेतल्यास त्याचाही फायदा भाजपाला होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भाजपाला मतदान केलं होतं. विधानसभा निवडणुकीतही ते भाजपालाच मतदान करतील, लोकसभेला मिळालेल्या मताधिक्याची पुनरावृ्त्ती या विधानसभेला होणार, असा विश्वासही भाजपा नेत्यांनी व्यक्त केलाय.


सम्बन्धित सामग्री