Sunday, April 06, 2025 12:08:12 PM

शेख हसीना यांच्या भाषणादरम्यान बांगलादेशात उफाळला हिंसाचार; निदर्शकांनी जाळले शेख मुजीबुर रहमान यांचे घर

शेख हसीना यांनी आपल्या भाषमादरम्यान म्हटलं की, 'ते इमारत पाडू शकतात, पण इतिहास नाही. त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की इतिहास त्याचा बदला घेतो.

शेख हसीना यांच्या भाषणादरम्यान बांगलादेशात उफाळला हिंसाचार निदर्शकांनी जाळले शेख मुजीबुर रहमान यांचे घर
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला
Edited Image

Bangladesh Violence: बांगलादेशची राजधानी ढाका येथे निदर्शकांनी देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ऐतिहासिक निवासस्थानावर हल्ला केला. घराची तोडफोड केल्यानंतर ते पेटवून देण्यात आले. त्यांची मुलगी आणि पदच्युत पंतप्रधान शेख हसीना ऑनलाइन लाईव्ह भाषण देत असताना ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, धनमोंडी परिसरातील या घरासमोर हजारो लोक जमले होते. हे घर आता स्मारक संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले आहे. तसेच ते बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीकात्मक स्थळ मानले जाते. 

अवामी लीगची आता विसर्जित झालेली विद्यार्थी संघटना छात्र लीगने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेख हसीना यांनी देशवासीयांना एकत्र येऊन सध्याच्या राजवटीचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, ते आपला राष्ट्रीय ध्वज, संविधान आणि लाखो लोकांच्या बलिदानाने मिळवलेले स्वातंत्र्य नष्ट करू शकत नाहीत.

हेही वाचा -  दिल्लीत भाजपाचे कमळ फुलणार? ; आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन

ते इमारत पाडू शकतात, पण इतिहास नाही - शेख हसीना

शेख हसीना यांनी आपल्या भाषमादरम्यान म्हटलं की, 'ते इमारत पाडू शकतात, पण इतिहास नाही. त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की इतिहास त्याचा बदला घेतो. 1971 च्या मुक्ती युद्धात पाकिस्तानी सैन्यानेही हे घर लुटले होते, पण ते पाडले नाही किंवा आग लावली नाही. आज हे घर पाडले जात आहे. त्याने कोणता गुन्हा केला? त्यांना या घराची इतकी भीती का वाटत आहे... मी देशातील जनतेकडून न्यायाची मागणी करते.'

दरम्यान, घटनास्थळी लष्कराच्या एका गटाने निदर्शकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना गोळीबाराचा सामना करावा लागला. निदर्शकांनी प्रथम इमारतीच्या भिंतीवरील शहीद नेत्याचे भित्तिचित्र खराब केले. स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजता हसीनाचे भाषण होणार असल्याने सोशल मीडियावर 'बुलडोझर मिरवणूक' काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. हसीनाचे भाषण छात्र लीगने आयोजित केले होते, जे आता अवामी लीगचे विसर्जित विद्यार्थी संघ आहे. आपल्या भाषणात, माजी पंतप्रधानांनी देशवासीयांना सध्याच्या राजवटीविरुद्ध संघटित प्रतिकार करण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा - जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर; भारताचा क्रमांक जाणून बसेल धक्का!

तथापी, हजारो निदर्शकांनी सांगितले की, शेख हसीनाचे कौटुंबिक घर घर त्यांच्या हुकूमशाहीचे प्रतीक आहे, तर पूर्वी ते देशाच्या स्वातंत्र्याशी जोडलेले मानले जात होते. राजधानी ढाका येथील हे घर हसीनाचे दिवंगत वडील आणि बांगलादेश स्वातंत्र्य नेते शेख मुजीबुर रहमान यांचे आहे. मुजीबुर यांनी बांगलादेश पाकिस्तानपासून औपचारिक वेगळे होण्याची घोषणा केली होती. मात्र, 1975 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर हसीनाने या घराचे संग्रहालयात रूपांतर केले होते. 
 


सम्बन्धित सामग्री