Monday, March 31, 2025 11:23:26 AM

‘बाबा मलाही पेटवून देतील’... चिमुकल्याचं अंगावर काटा आणणारं बोलणं, गंभीर गुन्हा उघडकीस

अडीच वर्षांच्या मुलाला जेव्हा त्याच्या वडिलांकडे जाण्यास सांगण्यात आलं,त्यावेळी “बाबा मलाही पेटवून देतील”, असं म्हणत त्याने वडिलांकडे जाण्यास नकार दिला. तो मुलगा खूप घाबरला होता.

‘बाबा मलाही पेटवून देतील’ चिमुकल्याचं अंगावर काटा आणणारं बोलणं गंभीर गुन्हा उघडकीस

कानपूर : घरगुती हिंसा, हुंड्यासाठी छळ, अपघात भासवण्यात येणाऱ्या विवाहित महिलांच्या हत्या किंवा हत्येचा प्रयत्न अशासारखे गुन्हे अद्याप थांबलेले नाहीत. अशा गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर असले तरी, बहुतेक वेळा अशा घटनांना प्रौढांच्या नजरेतूनच पाहिले जाते. मात्र, अशा प्रसंगांदरम्यान घरात लहान मुलेही असू शकतात. कधी-कधी त्यांच्याही जीवावर बेतू शकते किंवा त्यांच्या मनात मोठी भीती बसू शकते. स्वतःच्या आईला किंवा अत्यंत जवळच्या किंवा प्रेमळ नातेवाईकाला अशा प्रसंगातून जाताना पाहणं या मुलांच्या बालमनावर किती गंभीर परिणाम घडवून आणत असेल, याची कल्पनाही करवत नाही.

अशाच एका अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या वक्तव्यामुळे त्याच्याच पित्याने केलेला एक गंभीर गुन्हा उघडकीस आला. या मुलाच्या बोलण्यातून गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला. यानंतर या पीडित महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. स्वत:च्याच लहान मुलाने साक्ष दिल्यानंतर पत्नीला ठार करण्याचा प्रयत्न केलेला नराधम पती जेरबंद झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली. पोलि‍सांनी शनिवारी रात्री उशिरा कानपूरमधील जाजमऊ केडीए कॉलनीतील एका चामड्याचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीला पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे.

हेही वाचा - Crime News : ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या महिलेनं असा काढला त्याचा 'काटा'

या दाम्पत्याचे 2020 साली लग्न झाले होते. मात्र, पती पत्नीच्या कुटुंबीयांकडे हुंड्याची मागणी करत असल्याने दोघांमध्ये सतत वाद होत होते. यादरम्यान, 29 जानेवारी रोजी महिला तिच्या घरात गंभीरपणे जळालेल्या अवस्थेत आढळली होती, तर व्यापाऱ्याने ही घटना घराला आग लागल्याचा प्रकार असल्याचे सांगून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, अडीच वर्षांच्या मुलाला जेव्हा त्याच्या वडिलांकडे जाण्यास सांगण्यात आलं,त्यावेळी “बाबा मलाही पेटवून देतील”, असं म्हणत त्याने वडिलांकडे जाण्यास नकार दिला. तो मुलगा खूप घाबरला होता. आपल्या आईला वडिलांनीच पेटवून दिल्याचं त्याने पोलिसांना भीत-भीतच सांगितलं.

डास घालवण्याचे कॉइलमुळे घराला लागलेल्या आगीत आपल्याला भाजल्याचे पोलिसांना सांगावे, यासाठी महिलेच्या सासरच्यांनी तिच्यावर दबाव टाकला. इतकेच नाही तर, असे करण्यास नकार दिल्यास तिला व तिच्या मुलाला इजा पोहचवण्याची धमकीदेखील देण्यात आली. सासरच्यांच्या दबावाखाली येऊन महिलेने तसेच पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांना सांगितले.

रुग्णालयात जळालेल्या महिलेने आता तिच्या सासरच्या लोकांकडून सतत येणाऱ्या धमक्यांमुळे तिच्या मुलासाठी संरक्षण मागितले आहे. सासरच्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेने मुलासाठी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - HIV पॉझिटिव्ह व्यक्तीकडून 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण; तब्बल 10 महिने डांबून ठेवण्यात आईचीही साथ

पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून तपास केला जात आहे. दरम्यान महिलेच्या मुलाशी झालेल्या संवादादरम्यान, त्याच्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला. लहान मुलाने त्याच्या वडिलांकडे परत जाण्यास नकार दिला. तसेच, तो म्हणाला की, त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला पेटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीला अटक केली आहे.

डीसीपी (पूर्व) श्रवण कुमार सिंह या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाले की, 'या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. आम्ही चौकशी करत आहोत. पुढील कारवाईसाठी पीडितेचा जबाब नोंदवला जाईल.'


सम्बन्धित सामग्री