Sunday, April 06, 2025 12:26:07 PM

धडा शिकवण्यासाठी आपचे नुकसान केलं; काँग्रेस नेत्यांचा अजब दावा

सत्ताधारी आम आदमी पक्षाचा सुपडासाफ करत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर भगवा फडकवला आहे.

धडा शिकवण्यासाठी आपचे नुकसान केलं काँग्रेस नेत्यांचा अजब दावा

दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाचा सुपडासाफ करत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर भगवा फडकवला आहे. आपला या निवडणुकीत अवघ्या 22 जागांवर समाधन मानावे लागलंय. काँग्रेस पक्षाला दिल्लीत सलग तिसऱ्यांदा खातंही उघडता आलं नाही. अनेक जागांवर काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे आपचे उमेदवार काही मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले नसले तरी त्यांनी दिल्लीत आपला सत्तेपासून रोखलं यात धन्यता मानली आहे. मागील 15 वर्षे एकहाती सत्ता असलेली काँग्रेस त्यानंतर गेल्या 15 वर्षात एक जागाही जिंकू शकला नाही.
स्वतःचा पराभव झाला असतानाही केजरीवाल यांच्याकडून सत्ता हिरावून घेतली याचा आनंद काँग्रेसच्या नेत्यांना आहे. आपला आपण धडा शिकवला असा अजब दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. 
दिल्लीची सत्ता आम आदमी पार्टीनं काँग्रेसकडून हिरावून घेतल्याने काँग्रेसचा आपवर राग होता. यानिमित्ताने त्यांनी आपला धडा शिकवल्याचा काँग्रेसच्या नेत्यांना आनंद आहे.. त्याची कारणे पाहूयात

हेही वाचा : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपात जोरदार रस्सीखेच; मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नावांची चर्चा
 

आपच्या पराभवाने काँग्रेसला आनंद 

मागील दहा वर्षात  केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घेतली. दिल्लीच्या पराभवानं आपचं राष्ट्रीय राजकारणातील वजन घटण्याची शक्यता 
त्याचा फायदा काँग्रेस आणि राहुल गांधी यांना होणार असल्याचा दावा आहे. आपच्या विस्ताराचा मोठा फटका काँग्रेसला बसत होता. गुजरातमध्ये आपने पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढल्याने काँग्रेसचा पराभव झाला होता. आता दिल्लीमध्ये काँग्रेसने पूर्ण ताकदीनिशी लढून त्याचा वचपा काढला. दिल्लीतील पराभवामुळे आम आदमी पार्टी खचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंजाबची सत्ता मिळवण्याची संधी काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला होता. आता अन्य ठिकाणी आघाडी करणं आपला अपरिहार्य ठरण्याची शक्यता आहे. आपचा पराभव मत विभाजनानं झाला आहे. एकत्र आल्यास विजयाची खात्री अधिक आहे. आगामी निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकत्र आल्यास भाजपाला फटक्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेसनं आपली निवडणूक रणनिती बदलण्याची तयारी सुरू केली आहे. यात त्यांना आता जरी आपला धडा शिकवला असला तरी भाजपासारख्या राजकीय शत्रुचा पाडाव करायचा असेल तर आत्ताचा शत्रू भविष्यात चांगला मित्र बनवून भाजपाला शह देण्याचे स्वप्न काँग्रेसचे नेते पाहू लागले आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री