तिरुपती बालाजी मंदिर भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपतीमध्ये असलेल्या शेषाचलम पर्वतावर आहे. हे मंदिर भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात भगवान विष्णूंची प्राचीन मूर्ती आहे. तिरुपती बालाजी मंदिराला श्री वेंकटेश्वर मंदिर यानावाने देखील ओळखले जाते. जगभरातून लाखो भाविक तिरुपती बालाजी मंदिरात येतात. मान्यतेनुसार, मनोकामना पूर्ण झाल्यावर लाखो श्रद्धाळू तिरुपती बालाजी मंदिरात येऊन आपले केस त्यांना अर्पण करतात, तर काहीजण चालत - चालत तिरुपती बालाजी मंदिरात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. अनेक भाविक आपल्या श्रद्धेनुसार तिरुपती बालाजी यांना सोने, चांदी, अशा अनेक मौल्यवान वस्तू अर्पण करतात. चमत्कार आणि रहस्यांनी भरलेले तिरुपती बालाजी मंदिर भारतासोबतच जगभरात प्रसिद्ध आहे. जेव्हा भक्त श्रद्धेने त्यांच्यासमोर आपली इच्छा व्यक्त करतात, तेव्हा तिरुपती बालाजी त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात असे अनेक भाविक सांगतात. मंदिरातील वास्तुशैली, प्राचीन मूर्ती आणि तेथील चमत्कार अश्या अनेक गोष्टी भाविकांना आकर्षित करतात. तिरुपती बालाजी मंदिर इथल्या रहस्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. चला तर जाणून घेऊया तिरुपती बालाजी मंदिर मंदिरातील रहस्य.
हेही वाचा: Kantara Film: कांतारा चित्रपटांत दाखवलेल्या पंजुर्ली देवता कोण आहेत?
समुद्रसपाटीपासून ३२०० फूट उंचीवर श्री वेंकटेश्वर मंदिर बांधले आहे. हे मंदिर गेल्या अनेक शतकांपूर्वी बांधले असून हे मंदिर त्याच्या वास्तुशैली आणि दक्षिण भारतीय शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे.
तिरुपती बालाजी मंदिरातील गाभारा अतिशय थंड असतो. मात्र तरीसुद्धा या मूर्तीला सतत घाम येतो. या घामाचे थेंब स्पष्ट दिसतात.
या मंदिरात असलेली काळ्या रंगाची मूर्ती कोणीही तयार केली नसून ती मूर्ती स्वयंभू आहे आणि स्वतः जमिनीतून प्रकट झाली आहे असे तेथील पुजारी सांगतात. त्यामुळे या मूर्तीचे विशेष महत्व आहे.
हेही वाचा: शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून निर्णय
देवी लक्ष्मी तिरुपती बालाजी यांच्या हृदयात वास्तव्य करते. त्यामुळे दर गुरुवारी तिरुपती बालाजी यांचे सर्व शृंगार काढून त्यांना चंदनाचा लेप लावतात. त्यानंतर जेव्हा त्यांना अंघोळ घातली जाते तेव्हा त्या मूर्तीमध्ये देवी लक्ष्मी यांची छबी दिसून येते.
तिरुपती बालाजी यांच्या मूर्तीला खरे केस असून त्यांच्या केसांमध्ये कधीच गुंता होत नाही.
मंदिराच्या गाभाऱ्यात बाहेरचा आवाज कधीच येत नाही. मात्र, जेव्हा तुम्ही तिरुपती बालाजी यांच्या मूर्तीजवळ कान लावून ऐकता तेव्हा समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. परंतु या मंदिराच्या जवळपास कुठेही समुद्र नाही.
तिरुपती बालाजीच्या मंदिरातील दिवा कधीच विझत नाही. या दिव्यात कधीही कोणी तेल किंवा तूप टाकले नाही. मात्र अनेक वर्षांपासून हा दिवा जळत असल्यामुळे हा दिवा नेमकं कोणी लावला? हे अजूनही गुपितच आहे.
या मंदिराच्या उजव्या बाजूला एक काठी असते ज्याने तिरुपती बालाजी यांना लहानपणी मारले होते. काठीने मारल्यामुळे त्यांच्या हनुवटीवर जखम झाली होती. यामुळे त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावला जातो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)