PM Modi's Plane Entered Pakistan
Edited Image
PM Modi's Plane Entered Pakistan: नवी दिल्लीहून फ्रान्सला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तानात घुसले. पंतप्रधान मोदींचे विमान सुमारे 46 मिनिटे पाकिस्तानमध्ये होते. यामुळे इस्लामाबादमध्ये खळबळ उडाली. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजने यासंदर्भात माहिती दिली आहे. नवी दिल्ली ते पॅरिस या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला, असे ARY न्यूजने नागरी विमान वाहतूक सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान 'इंडिया 1' शेखपुरा, हाफिजाबाद, चकवाल आणि कोहट मार्गे पाकिस्तानी हद्दीत घुसले. मोदींचे विमान तब्बल 46 मिनिटे पाकिस्तानच्या हद्दीत राहिले. या घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांनी पुढे सांगितले की, अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्याने भारतीय पंतप्रधानांच्या विमानाला परवानगी देण्यात आली.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची धमकी भोवली; मुंबईतील कॉलरला अटक
यापूर्वीही भारताने केला आहे पाकिस्तानेच्या हवाई हद्दीचा वापर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, मोदींच्या विमानाने पोलंडहून दिल्लीला जाताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला होता.
हेही वाचा - Ayodhya Ram Mandir : मुख्य पुरोहिताला किती वेतन मिळते? जाणून घ्या आचार्य सत्येंद्र दास यांचा पगार
दरम्यान, नवी दिल्लीहून उड्डाणाच्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान रात्री 11 वाजता पाकिस्तानच्या हद्दीत घुसले. यावेळी पंतप्रधानांचे विमान तब्बल 46 मिनिटे पाकिस्तानच्या हद्दीत राहिले. यापूर्वी, जेव्हा नरेंद्र मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना भेटण्यासाठी कीवला जाताना पोलंडची राजधानी वॉर्सा येथे गेले होते, तेव्हा त्यांचे विमानही पाकिस्तानमधून गेले होते.