Monday, April 07, 2025 11:02:47 AM

पंतप्रधान मोदी 12-13 फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट

पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्

पंतप्रधान मोदी 12-13 फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट
Donald Trump, PM Modi
Edited Image

PM Modi To Visit US: पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 आणि 13 फेब्रुवारी दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासंदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी माहिती दिली. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कडक कारवाई सुरूच आहे. 

अमेरिकन हवाई दलाचे सी-17 ग्लोबमास्टर लष्करी विमान 104 भारतीय नागरिकांना घेऊन बुधवारी दुपारी अमृतसर येथील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. सध्या डोनाल्ड ट्रम्प देशात निर्वांसितांवर कारवाई करत आहेत. इमिग्रेशन धोरणाअंतर्गत हजारो बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हाकलून लावले जात आहे. आता मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्यानंतर या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

हेही वाचा - अमेरिकेत अटकेत असताना खायला दिलं जात होतं गोमांस;मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या लोकांनी सांगितली आपबीती

अमेरिका-चीनमध्ये व्यापार युद्ध - 

अमेरिका-चीन व्यापार युद्ध सुरू झाले आहे, चीनने प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले आहे. जर भारत भविष्यात ट्रम्पच्या आयात शुल्कापासून वाचला तर चीनवर लादलेल्या आयात शुल्काचा त्याला मोठा फायदा होऊ शकतो. पंतप्रधान मोदी 12 फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि ट्रम्प यांच्याशी व्यापारासह विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वी अनेक वेळा भारताच्या शुल्क रचनेवर टीका केली आहे. तथापी, व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारताने काही धोरणात्मक बदल सादर केले. यामध्ये हार्ले-डेव्हिडसनसह आयात केलेल्या मोटारसायकलींवरील सीमाशुल्कात कपात समाविष्ट आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात अमेरिकन मोटारसायकलींवर भारताने मोठ्या प्रमाणात कर लादल्याबद्दल टीका केली होती.

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी कारवाई! अमेरिकेतून 104 हद्दपार केलेल्या भारतीयांना घेऊन जाणारे विमान अमृतसरमध्ये दाखल

भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होण्याची शक्यता - 

दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ युद्ध टाळण्यासाठी व्यापार करार होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या फेरीच्या टॅरिफमध्ये भारताला वगळले आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामध्ये काही वस्तूंसाठी टॅरिफ सवलती आणि गुंतवणुकीवर व्यापक करार समाविष्ट असू शकतो. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत कोणत्या विषयावर चर्चा होईल, हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री