Thursday, March 06, 2025 01:39:32 PM

PM Internship Scheme 2025 साठी नोंदणी सुरू – जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि महत्त्वाचे तपशील!

भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) PM Internship Scheme (PMIS) 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टल pminternship.mca.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

pm internship scheme 2025 साठी नोंदणी सुरू – जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि महत्त्वाचे तपशील

भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) PM Internship Scheme (PMIS) 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टल pminternship.mca.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

कुणी करू शकतो अर्ज?
    •    भारतीय नागरिक असावा.
    •    वय 21 ते 24 वर्षे असावे.
    •    शैक्षणिक पात्रता: किमान 10वी पास, 12वी, पदवीधर किंवा डिप्लोमा धारक.
    •    अर्जदार कोणत्याही पूर्णवेळ किंवा अर्धवेळ नोकरीत असू नये.
    •    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2025.

हेही वाचा : Navratna Company: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IRCTC आणि IRFC ला मिळाला नवरत्न कंपनीचा दर्जा

PM Internship Scheme 2025 साठी बजेट आणि लाभ
    •    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ₹800 कोटींचे बजेट या योजनेसाठी मंजूर केले आहे.
    •    या योजनेची अधिकृत सुरुवात 3 ऑक्टोबर 2024 रोजी झाली.
    •    देशभरातील टॉप 500 कंपन्यांमध्ये उमेदवारांना संधी मिळणार आहे.
    •    ₹6,000 मासिक स्टायपेंड दिले जाईल.
    •    ऑटोमोबाईल्स, फायनान्स, हॉस्पिटॅलिटी आणि टेक्नॉलॉजी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण मिळेल.

PM Internship Scheme 2025 साठी अर्ज कसा करावा?

Step 1: अधिकृत वेबसाईट pminternship.mca.gov.in ला भेट द्या.
Step 2: होमपेजवरील नोंदणी लिंक शोधून आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.
Step 3: रजिस्ट्रेशन प्रक्रियेनंतर मिळालेल्या क्रेडेन्शियल्सने लॉगिन करा.
Step 4: फॉर्ममधील सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
Step 5: फॉर्म सबमिट करून कन्फर्मेशन पेज सेव्ह करून ठेवा.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या!
 


सम्बन्धित सामग्री