Wednesday, September 25, 2024 11:41:38 PM

250 YEARS OLD BANYAN TREE
अबब ! २५० वर्षे जुना वटवृक्ष...

२५० वर्षे जुना वटवृक्ष वटवृक्ष भारतात सापडला आहे. पश्चिम बंगालमधील हावडा शहरात हा महाकाय वटवृक्ष आहे.

अबब  २५० वर्षे जुना वटवृक्ष
BANYAN TREE

२५ सप्टेंबर, २०२४ पश्चिम बंगाल : २५० वर्षे जुना वटवृक्ष वटवृक्ष भारतात सापडला आहे. पश्चिम बंगालमधील हावडा शहरात हा महाकाय वटवृक्ष आहे. 
 हा वटवृक्ष जगातील सर्वात मोठा वटवृक्ष म्हणून ओळखला जाता. पश्चिम बंगालमधील हावडा शहरातील आचार्य जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन कोलकाता येथे हा महाकाय वृक्ष आहे. 

झाडावर राहतात ८० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी
या झाडावर ८० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आहेत. हे वडाचे झाड २५० वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. ते अंदाजे १४ हजार ५०० चौरस मीटरमध्ये पसरले आहे. या झाडाची उंची २४ मीटर असून त्याला ३ हजारपेक्षा जास्त पारंब्या आहेत. पारंब्या आता मुळाप्रमाणे जमिनीत खोलवर गेल्या आहेत. या झाडाला जगभरात वॉकिंग ट्री नावाने ओळखले जाते. १७८७ मध्ये या झाडाच्या भोवती आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बोटॅनिकल गार्डनची स्थापन करण्यात आली. त्यामुळे तेव्हा हे झाड १५ ते २० वर्ष जुने असल्याचे मानले जाते.

भारत सरकारने तयार केले टपाल तिकीट
हा जगातील सगळ्यात मोठा वटवृक्ष म्हणून ओळखला जातो. या झाडाची मुळे आणि मोठ्या फांद्या पाहून लोकांना ते जंगलात आल्याचा भास होतो. या झाडावर भारत सरकारने १९८७ मध्ये टपाल तिकीट जारी केले होते. सध्या एक टीम झाडाची काळजी घेण्याचे काम करते. तसेच वेळोवेळी झाडाची तपासणी केली जाते.


सम्बन्धित सामग्री