मुंबई: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या तिसऱ्या मजल्यावर असलेले NMACC आर्ट्स कॅफे २९ डिसेंबर २०२४ रोजी सर्वसामान्यांसाठी खुले होत आहे. या कॅफेचे उद्घाटन अंबानी कुटुंबातील सदस्य कोकिलाबेन अंबानी, निता अंबानी, आकाश अंबानी, राधिका आणि श्लोक अंबानी यांच्या हस्ते झाले. यावेळी बॉलीवूडमधील नामवंत कलाकारांनी देखील आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
NMACC आर्ट्स कॅफे हे केवळ भोजनगृह नसून, कला आणि संस्कृतीसाठी समर्पित एक जागा आहे. येथे येणाऱ्या रसिकांना उत्कृष्ट खाद्यपदार्थांसोबतच भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेता येईल. या ठिकाणी विविध कलाकृतींचे प्रदर्शन, परफॉर्मन्स आणि कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. ओरी, खुशी कपूर, मनिष मल्होत्रा, अजय पिरामल, कटरीना कैफ, श्रीराम नेने, माधुरी दीक्षित, करण जोहर, जान्हवी कपूर, शहनाज, शाहिद कपूर आणि मीरा कपूर, शाहरुख खान पत्नी गौरी खान आणि सुहाना खान, अर्जुन कपूर, विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.
NMACC आर्ट्स कॅफे हे कलात्मकतेचा अनुभव देणारे एक आदर्श स्थळ ठरणार आहे. येथील अनोख्या संकल्पनेमुळे कला व संस्कृतीप्रेमींना एक नवी ऊर्जा मिळेल.