सापुतारा : नाशिक-गुजरात महामार्गावर एक खासगी बस 200 फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. गुजरातमधील सापुतारा (Nashik-Gujarat highway Accident) येथे हा अपघात घडला.
हेही वाचा - FDI In Insurance : शंभर टक्के FDI! विमा क्षेत्रात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीस मंजुरी
सापुतारा हिल स्टेशनजवळ बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस 200 फूट दरीत कोसळली. पोलीस अधीक्षक एस. जी. पाटील यांनी या अपघाताची माहिती दिली. अपघात झालेल्या बसमध्ये 48 प्रवासी प्रवास करत होते. ही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले संरक्षक बॅरिकेड्स तोडून खोल दरीत कोसळली, असे त्यांनी सांगितले. पहाटे 4 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला.
हेही वाचा - Budget 2025: सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 कार्यक्रमांतर्गत पोषण सहाय्य वाढवण्याचा निर्णय
बसमध्ये 48 भविक प्रवास करत होते. ही बस नाशिक येथील त्र्यंबकेश्वरहून निघून गुजरातमधील द्वारका येथे जात होती. यादरम्यान हा अपघात झाला. बसमधील भाविक मध्य प्रदेशमधील गुणा, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.