Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana
Edited Image
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana: आता पैशाअभावी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. कारण आता केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान विद्या लक्ष्मी शिक्षण योजनेला मंजुरी दिली आहे. खरं तर, याअंतर्गत, 8 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्याला 3 टक्के व्याज अनुदानावर 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. कोणताही गुणवंत विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, असा या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत, प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज दिले जाईल. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. परंतु, पैशाअभावी अनेकांना आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते.
कोठे राबवण्यात येणार योजना?
ही योजना देशातील उच्च दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांना लागू असेल. ही यादी दरवर्षी नवीनतम NIRF रँकिंग वापरून अपडेट केली जाईल. याची सुरुवात पहिल्या 860 पात्र QHEIs पासून होईल. यामध्ये, 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना जर त्यांची इच्छा असेल तर ते पीएम-विद्यालक्ष्मीचा लाभ घेऊ शकतील. पंतप्रधान विद्या लक्ष्मी शिक्षण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्याचे आधार कार्ड, फोटो, ओळखपत्र आणि मागील शिक्षणाची सर्व कागदपत्रे आवश्यक असतील.
हेही वाचा - PM Internship Scheme 2025 Registration: पीएम इंटर्नशिपसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करू शकता
व्याज अनुदान योजना -
दरम्यान, विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी थकबाकी असलेल्या डिफॉल्ट रकमेच्या 75 % क्रेडिट गॅरंटी देखील मिळेल. यामुळे बँकांना या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यास मदत होईल. याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे आणि जे इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्याज अनुदान योजनांअंतर्गत लाभांसाठी पात्र नाहीत त्यांनाही स्थगिती कालावधीत 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 3 टक्के व्याज अनुदान दिले जाईल. दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना व्याज अनुदानाची मदत दिली जाईल. तसेच सरकारी संस्थांमधून येणाऱ्या आणि तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे?
उच्च शिक्षण विभागाकडे 'पीएम-विद्यालक्ष्मी' हे एकात्मिक पोर्टल असेल ज्यावर विद्यार्थी सर्व बँकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या सोप्या अर्ज प्रक्रियेद्वारे शैक्षणिक कर्जासह व्याज अनुदानासाठी अर्ज करू शकतील. व्याज अनुदान ई-व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) वॉलेटद्वारे दिले जाईल. भारतातील तरुणांना दर्जेदार उच्च शिक्षणाची जास्तीत जास्त उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा - Short Term साठी इन्वेस्टमेंट करायची असेल तर 'या' योजनेत करा गुंतवणूक; 2 ते 3 वर्षांतचं व्हाल मालामाल!
पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?
पंतप्रधान विद्या लक्ष्मी शिक्षण योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना सोप्या आणि डिजिटल प्रक्रियेद्वारे हमीशिवाय शैक्षणिक कर्ज मिळेल. यामध्ये, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना सर्वात कमी व्याज अनुदानासह कर्ज दिले जाईल. या योजनेअंतर्गत, सर्व बँकांकडून डिजिटल अर्ज प्रक्रियेद्वारे सहज आणि कमी वेळेत कर्ज उपलब्ध होईल. यामध्ये, सर्व बँका कर्ज अर्जासाठी एकात्मिक डिजिटल स्वरूप प्रदान करतील.