Wednesday, September 18, 2024 06:01:04 AM

Misleading Muslims and Opposing WAQF Reforms
कशाला मुसलमानांची माथी भडकावतायेत ?

केंद्र सरकारने (WAQF) वक्फ सुधारणेच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देत, धार्मिक समुदायांना दिशाभूल करणाऱ्या कार्यप्रणालींविरोधात ठोस पावले उचलली जातील  असा इशारा रिजिजू यांनी दिला आहे.

कशाला मुसलमानांची माथी भडकावतायेत  

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुसलमानांच्या वस्त्यांमध्ये (WAQF) वक्फ सुधारणेच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. यामध्ये विखारी जाकीर नाईक याने मुसलमानांमध्ये संभ्रम आणि सरकार विरोधात वातावरण तापवण्याचं काम सुरू केले आहे, ज्यांत काही मुसलमानांनी चिथावणी देत दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. वक्फ सुधारणेच्या विरोधात भोंगे लावून वातावरण चिघळवण्याचे काम सुरू आहे.

 

केंद्रीय कायदामंत्री किरण रिजिजू यांनी या परिस्थितीला दुजोरा देत समाज माध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट करून, मुसलमानांची दिशाभूल बंद करण्याची मागणी केली आहे. रिजिजू यांनी प्रश्न केला आहे, "मुसलमानांना फसवून फायदा काय होणार?" त्यांच्या मतानुसार, (WAQF) वक्फ सुधारणेच्या विरोधात चिथावणी देणारे व्यक्ती फक्त वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं समाजात अराजकता निर्माण होऊ शकते.

केंद्र सरकारने (WAQF) वक्फ सुधारणेच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देत, धार्मिक समुदायांना दिशाभूल करणाऱ्या कार्यप्रणालींविरोधात ठोस पावले उचलली जातील  असा इशारा रिजिजू यांनी दिला आहे.


सम्बन्धित सामग्री