Sunday, September 08, 2024 09:18:30 AM

Narendra Modi
कारगिल वीरांना मोदींची सलामी

कारगिल लढाईत मिळालेल्या विजयाला २५ वर्षे झाली. या निमित्ताने २५ वा कारगिल विजय दिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलचा दौरा केला.

कारगिल वीरांना मोदींची सलामी

द्रास : कारगिल लढाईत मिळालेल्या विजयाला २५ वर्षे झाली. या निमित्ताने २५ वा कारगिल विजय दिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलचा दौरा केला. द्रास येथे कारगिल वीरांच्या स्मरणार्थ बांधलेल्या युद्ध स्मारकाला भेट दिली. पंतप्रधान मोदींनी कारगिल वीरांना सलामी दिली. यानंतर पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (दूरदृश्य प्रणालीने) शिंकुन ला भुयारी मार्गाच्या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला. या भुयारी मार्गामुळे वर्षभरात कधीही केव्हाही लेहमध्ये जाणे - येणे सोपे होणार आहे. हा जगातील सर्वात उंचावर असलेला भुयारी मार्ग असेल. शिंकुन ला भुयारी मार्गामुळे लष्करी वाहतूक वेगाने होण्यास मदत होणार आहे. हा भुयारी मार्ग लडाखच्या विकासाला चालना देईल. 


सम्बन्धित सामग्री