Tuesday, April 01, 2025 08:03:52 PM

Budget 2025: संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ, चीन-पाकिस्तानसाठी रेड अलर्ट!

भारत सरकारने 2024-25 साठी 4,54,773 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, यावर्षी संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 36,959 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 4,91,732 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.

budget 2025 संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ चीन-पाकिस्तानसाठी रेड अलर्ट

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्णकालीन सर्वसाधारण अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात भारताच्या संरक्षण क्षेत्राला मोठे बजेट देण्यात आले असून, चीन आणि पाकिस्तानसाठी हा एक प्रकारचा रेड अलर्ट मानला जात आहे.

भारत सरकारने 2024-25 साठी 4,54,773 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, यावर्षी संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 36,959 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 4,91,732 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. ही वाढ भारतीय सैन्याच्या ताकदीत मोठी भर घालणार आहे.

Union Budget 2025: पुढील 5 वर्षांत 50,000 सरकारी शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब

सरकारच्या या निर्णयामुळे संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत होईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताची सुरक्षा अधिक भक्कम केली जाईल. लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी, सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनांना चालना देण्यास हे बजेट महत्त्वाचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

भारताची वाढती संरक्षण क्षमता पाहता चीन आणि पाकिस्तानमध्ये चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या या निर्णयाची चर्चा सुरू झाली असून, मोदी सरकारच्या संरक्षणविषयक दृष्टीकोनाचे कौतुक होत आहे.


 


सम्बन्धित सामग्री