Sunday, September 08, 2024 10:27:31 AM

Indian Economy
'भारत २०३१ पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था'

भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला २०४८ पर्यंत वाट बघावी लागणार नाही.

भारत २०३१ पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगाने वाटचाल सुरू आहे. देशाचा विकासदर लक्षणीय आहे. कोरोना संकटामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था मंदावली पण भारताची अर्थव्यवस्था वेगाने सावरली. भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला २०४८ पर्यंत वाट बघावी लागणार नाही. मोदी सरकारच्या कामाचा झपाटा आणि देशाचा विकासदर यामुळे भारत २०३१ पर्यंत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकतो, असा विश्वास भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल डी. पात्रा यांनी व्यक्त केला.

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्था

  1. अमेरिका - २८ हजार ७८३ अब्ज डॉलर जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन)
  2. चीन - १८ हजार ५३६ अब्ज डॉलर जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन)
  3. जर्मनी - ४ हजार ५९० अब्ज डॉलर जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन)
  4. जपान - ४ हजार ११२ अब्ज डॉलर जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन)
  5. भारत - ३ हजार ९४२ अब्ज डॉलर जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन)

सम्बन्धित सामग्री