Tuesday, April 15, 2025 03:16:12 AM

Fighter Aircraft Crash In Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळ हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले. पायलट सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात पायलट सुखरूप बचावला. अपघातानंतर लढाऊ विमानाला आग लागली.

fighter aircraft crash in madhya pradesh मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले
Fighter Aircraft Crashes In Madhya Pradesh
Edited Image

Fighter Aircraft Crash In Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळ हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले. पायलट सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात पायलट सुखरूप बचावला. अपघातानंतर लढाऊ विमानाला आग लागली. 

लढाऊ विमानाने ग्वाल्हेर येथून केलं होतं उड्डाण - 

प्राप्त माहितीनुसार, भारतीय वायुसेनेचे मिराज 2000 हे लढाऊ विमान शिवपुरीमधील एका शेतात कोसळले. हे विमान पाहण्यासाठी स्थानिक लोकांनी शेताभोवती प्रचंड गर्दी केली होती. हे लढाऊ विमान मिराज 2000 ने ग्वाल्हेर येथून उड्डाण केले होते. हे विमान नियमित प्रशिक्षणावर होते. स्थानिक लोकांनी पायलटशी संपर्क साधून त्याला त्याला मदत केली. विमानाच्या पायलटने स्वतः नियंत्रण कक्षाला लढाऊ विमानाच्या अपघाताची माहिती दिली.

हेही वाचा - शेख हसीना यांच्या भाषणादरम्यान बांगलादेशात उफाळला हिंसाचार; निदर्शकांनी जाळले शेख मुजीबुर रहमान यांचे घर

अपघातानंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये असे दिसून येते आहे की, पायलट त्याच्या सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती देत ​​होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी एक पथक पाठवले. मात्र, विमान अपघातामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातात हवाई दलाचे मिराज-2000 पूर्णपणे जळून खाक झाले आहे. 

फिलाडेल्फियामधील विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू - 

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये उड्डाणानंतर काही वेळातच एक वैद्यकीय वाहतूक करणारे विमान कोसळले. या अपघातामुळे घटनास्थळी आगीचा मोठा भडका उडाला होता. हा अपघात ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळापासून तीन मैलांपेक्षा कमी अंतरावर झाला, जे प्रामुख्याने व्यावसायिक जेट आणि चार्टर विमानांसाठी सेवा देते. या अपघातामुळे परिसरातील निवासी घरांना आग लागली होती. 
 


सम्बन्धित सामग्री