Wednesday, April 09, 2025 11:40:11 AM

दिल्लीतील एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवाराला किती मते मिळाली? 'या' जागेवरून लढवली होती निवडणूक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत फक्त एकाच ट्रान्सजेंडर उमेदवाराने निवडणूक लढवली. मात्र, या ट्रान्सजेंडर उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, या उमेदवाराला किती मते मिळाली हे जाणून घेऊयात.

दिल्लीतील एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवाराला किती मते मिळाली या जागेवरून लढवली होती निवडणूक
Transgender Candidate Rajan Singh
Edited Image

Delhi Election Results 2025: दिल्लीत विधानसभा निवडणुकाचे निकाल आज समोर आले आहेत. 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत मिळवले असून आता भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत फक्त एकाच ट्रान्सजेंडर उमेदवाराने निवडणूक लढवली. मात्र, या ट्रान्सजेंडर उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, या उमेदवाराला किती मते मिळाली हे जाणून घेऊयात. 

राजन सिंह यांना मिळाली 85 मते - 

खरं तर, दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवार, राजन सिंह यांनी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना 85 मते मिळाली. या जागेवर 556 जणांनी 'नोटा'चा पर्याय निवडला आहे. निवडणूक आयोगाने हे आकडे जाहीर केले आहेत. दिल्लीचे एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवार, राजन सिंह यांनी आम जनता पार्टीच्या तिकिटावर कालकाजी येथून निवडणूक लढवली. आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी देखील या जागेवरून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. तसेच भाजपने येथून रमेश बिधुरी यांना तिकीट दिले होते.

हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या 'या' 6 उमेदवारांना मिळाले केवळ 'एक-अंकी' मते

आतिशीने राखला आपचा गड - 

आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी यांनी दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातून 3 हजारहून अधिक मतांच्या फरकाने भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांचा पराभव केला. आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी यांना 52154 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांना 48633 मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या अलका लांबा 4392 ​​मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. तसेच ट्रान्सजेंडर उमेदवार राजन सिंह आठव्या क्रमांकावर राहिले. 

हेही वाचा - - Delhi Election Results 2025: भाजपा आले, आप गेले

दरम्यान, भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांनी मुख्यमंत्री आतिशी यांना कडक टक्कर दिली. एका मतमोजणीच्या फेरीत ते निवडणूक जिंकतील असं वाटलं होतं. पण शेवटच्या तीन फेऱ्यांच्या मतमोजणीच्या वेळी, आतिशी यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली आणि रोमांचक स्पर्धेत निवडणूक जिंकून आम आदमीची प्रतिष्ठा राखली. खरं तर, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षातील अनेक वरिष्ठ नेते दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. 
 


सम्बन्धित सामग्री