मुंबई : HMPV म्हणजेच ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस. ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस हे वाचताना तुमच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. पण, हा व्हायरस चिंतेनेदेखील तुमचा भुवया उंचावेल. चीन नवीन तंत्रज्ञानच्या संशोधनासाठी जेवढं चर्चेत असतं तेवढच नवीन रोगांच्या संशोधनासाठी देखील चर्चेत असतं. HMPV ने चीनला आपल्या विळख्यात घ्यायला सुरवात केली आहे. चीनमध्ये एकंदर भीती सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे.
HMPV हा व्हायरसचे भारतातदेखील आगमन झाले आहे. भारतात HMPV चे तीन रुग्ण आढळून आले आहेत. एक रुग्ण गुजरातमध्ये आढळला आहे तर दोन रुग्ण बंगळुरूमध्ये आढळून आले आहेत. बंगळूरमध्ये आठ महिन्यांच्या चिमुरडीला या व्हायरसची लागण झाली आहे. बाळामध्ये HMPV व्हायरसची लक्षणं आढळून आल्यामुळे तिचे नमूने तपासणीसाठी तातडीने पाठवण्यात आले. या व्हायरसची
याप्रकरणी आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आम्ही आमच्या लॅबमध्ये याची चाचणी केलेली नाही. मात्र, या प्रकरणाचा अहवाल एका खासगी रुग्णालयात आला आहे. खासगी रुग्णालयाच्या या अहवालावर शंका घेण्याचे कारण नाही.
HMPV ची लक्षणे ही कोरोना सारखीच आहेत. HMPV हा व्हायरस मुख्यतः लहान मुले व वयस्कर माणसांना होतो. यांचे संक्रमण श्वसन मार्गातून होते.
HMPV आपण कसे वाचू शकतो ?
खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड आणि नाक टिश्यू किंवा रुमालाने झाका.
साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा.
गर्दीची ठिकाणे टाळा, विशेषत: अस्वस्थ वाटत असल्यास, आणि इतरांशी जवळचा संपर्क मर्यादित करा.