MahaKumbh Fire: शुक्रवारी महाकुंभात पुन्हा आग लागल्याची घटना घडली. सेक्टर 18 जवळ ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु दिलासादायक बाब म्हणजे आग वेळेत आटोक्यात आणण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळावर अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
आगीत 22 तंबू जळून खाक -
खाक चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक योगेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, जुन्या जीटी रोडवरील तुळशी चौकाजवळील एका छावणीत आग लागली. तथापि, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यात व्यस्त आहेत. मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीमुळे 22 तंबू जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - HIV पॉझिटिव्ह व्यक्तीकडून 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण; तब्बल 10 महिने डांबून ठेवण्यात आईचीही साथ
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 40 गाड्या दाखल -
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 40 गाड्या अवघ्या 5 मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या. महाकुंभ मेळा परिसरातील शंकराचार्य मार्ग सेक्टर 18 मध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली आहे, असे एसपी सिटी सर्वेश कुमार मिश्रा यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचा - शाळेत लागली अचानक आग; जवळपास 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू
महाकुंभात दुसऱ्यांदा आगीची घटना -
गेल्या महिन्यातही महाकुंभ मंडपात आग लागली होती. त्यानंतर एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, प्रथम एका लहान सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर, तीन मोठे सिलिंडर फुटले आणि आग अधिक तीव्र झाली. आग लागल्यानंतर सात-आठ मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यात आली.