Wednesday, September 18, 2024 06:03:37 AM

Fake Documents
स्पर्धा परीक्षांसाठी बनावट कागदपत्रे, चौकशीचे आदेश

राष्ट्रपतींनी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी सादर होणाऱ्या बनावट कागदपत्रांप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्पर्धा परीक्षांसाठी बनावट कागदपत्रे चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी बनावट कागदपत्रे सादर होत असल्याचे आढळून आहे. पूजा खेडकर हे याचे ताजे उदाहरण आहे. या प्रकाराची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रपतींनी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी सादर होणाऱ्या बनावट कागदपत्रांप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयाला योग्य ती कारवाई करण्यासाठी राष्ट्रपतींनी निर्देश दिले आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री